Tuesday, January 4, 2011

मनस्वी

आईच्या मांडीवर डोकं टेकवून ऐकणं लोरी गाणं
'हेलीकॉप्टर'मागे दुपारचं ते अथक धावणं
हवा आहे अनोळख्यावर दाखवायचा निर्भेळ विश्वास
अन हवं आहे पु.लंचं 'म्हैस' ऐकून खदाखदा हसणं

राजेश खन्नाचा 'आनंद' बघून ढसाढसा रडणं
आणि कागदाच्या होड्या पाऊसपाण्यात सोडणं
हवा आहे मामाच्या गावच्या आगगाडीचा झुकझुक आवाज
अन हरवलेल्या छोट्या मनीमाऊला आईचा ओरडा खाऊन घरात आणणं

भिकार सावकाराच्या हातावरून ताईशी भांडणं
अन तिचंच थोड्या वेळानी प्रेमानी कुरवाळणं
हवी आहे झोपाळ्यावरची तीच ती मटरगश्ती
अन हवं आहे वाघ्याला शेपूट खेचून खेचून सतावणं

नको आहे हे व्यावहारीक जगण्यासाठी धडपडणं
हवं आहे तर केवळ उत्स्फूर्त, मनस्वी, कलासक्त जगणं

2 comments:

  1. हो नं... पण काय करणार :(

    ReplyDelete
  2. तू नको बोलू. I think you are amongst some of the most spontaneous people on earth, the French. Aren't they? I mean with their love for arts and other 'fine' things in life. Correct me if I'm wrong.

    आणि करता येण्यासारख सगळ आहे. आई अजूनही लोरी गाऊ शकते. पु.ल तर evergreen आहेत. 'आनंद' बघून रडूही शकतो. If only 'being a MAN and GROWN-UP' feeling is done away with. फक्त दिखाऊपणा सोडायच धाडस पाहीजे.

    व्यवहार पूर्णतः सोडावा असा म्हणण नाही. But at least not at the cost of 'real life'.

    ReplyDelete